तरूणावर कोयत्याने हल्ला करणारे पाच जण अटकेत

चौपाटी कारंजा येथे पाण्यावरून घडली होती घटना
तरूणावर कोयत्याने हल्ला करणारे पाच जण अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून झालेल्या वादात तरूणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पाच जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. वसीम फारूख शेख, युसुफ फारूख शेख, रेशम वसीम शेख, यासमिन युसुफ शेख, आशा फारूख शेख (सर्व रा. चौपटी कारंजा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांनी बुधवारी सकाळी खलील यासीन सय्यद (वय 45 रा. चौपाटी कारंजा, अहमदनगर) याला दांडके, दगडाने मारहाण करत कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याची पत्नी रेश्मा खलील सय्यद (वय 35) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. पाच जणांना अटक केली असून कुदुस शेख (रा. चौपाटी कारंजा) व आक्रम शेख (रा. मुकुंदनगर) हे पसार झाले आहेत.

बुधवारी सकाळी नळाला पाणी आल्यानंतर नळाला विद्युत मोटार जोडण्यावरून हा वाद झाला होता. त्यातून सात जणांनी खलील यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक दुर्गे, पोलीस अंमलदार दीपक रोहकले, सोमनाथ राऊत, सुमित गवळी, योगेश भिंगारदिवे, अमोल गाडे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, सागर पालवे, तानाजी पवार, प्रशांत बोरूडे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com