<p><strong>नेवासा lतालुका प्रतिनिधी l Newasa</strong></p><p>लग्नाचे आमिष दाखवून रस्तापुर ता.नेवासा येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका युवकास शनिशिंगणापुर पोलिसांनी अटक केली आहे.</p>.<p>याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की,मागील आठवड्यात रस्तापुर ता.नेवासा शिवारातील अशोक रायभान उकिर्डे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतातील आंब्याच्या झाडाजवळ पंधरा वर्षिय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हा प्रकार कुणास सांगितल्यास तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारुन टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी किशोर रमेश काकडे यास अटक करण्यात आली आहे. शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी शनिशिंगणापुर पोलिस ठाण्यास भेट देवून मार्गदर्शन केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे पुढील तपास करत आहेत.</p>