
राहाता |प्रतिनिधी| Rahata
साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अत्याचारित तरुणीने राहाता पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड याने माझा नंबर नातलगाकडून घेतला. त्यानंतर मोबाईलवर, व्हॉट्सअॅपवर संभाषण व चॅटींग करत होता. त्यास नाकारले तेव्हा त्याने हाताला दुखापत करून माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवले.
भीतीपोटी मी घरात सांगितले नाही. त्यानंतर कॉलेजला जात असताना तिघांनी एका चारचाकी गाडीत पाठलाग करत ऋषिकेश गायकवाड जवळीक साधत होता. त्याला जोडीदार मंगेश धिवर व अंकुश वानखेडे साथ देत होते. त्यामुळे त्यादिवशी कोणालाही न सांगता रागाने निघून गेले होते. राहाता पोलीस ठाण्यात मिसींग दाखल असल्याचे समजल्यानंतर पाहुण्यांच्या येथून घरी आले. घरच्यांना तिघे त्रास देत असल्याचे सांगितले.
एक वर्षापासून 14 जानेवारी 2022 पर्यंत ऋषिकेश त्याच्या जोडीदारासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या पाठलाग करून त्रास देत आहेत. मोबाईलवर प्रपोज करून लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व चॅटींग करत धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार करत असल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
तरुणीच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात भादंवी कलम 354 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.