एएमटी बसच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू

एएमटी बसच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एएमटी बसच्या (AMT Bus) धडकेत जखमी झालेल्या तरुणीचा (Young Woman) काल मृत्यू झाला. तिच्यावर नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविना विठ्ठल सुद्रिक (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा, हल्ली मुक्काम केडगाव, नगर) असे मयत (Death) मुलीचे नाव आहे.

एएमटी बसच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू
उत्साही पतंगबाजीचा संडे

मुलीचे वडील विठ्ठल बाळकृष्ण सुद्रिक (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांनी सिटी बसचालकाविरोधात फिर्याद दिली. मयत रविना ही शहरातील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) नोकरीस होती. नोकरीच्या निमित्ताने ती केडगाव (Kedgav) येथे वास्तव्यास होती. तेथून नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. 9) सकाळी कामावर येण्यास निघाली होती, ती सिटी बसने प्रेमदान चौकात (Premdan Chowk) आली.

एएमटी बसच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू
निवृत्तीवेतनधारकांच्याही महागाई भत्यात वाढ

सिटी बसमधून (AMT Bus) उतरून रुग्णालयाकडे जात असताना ज्या बसमधून ती आली त्याच बसची तिला पाठीमागून धडक बसली. त्यात ती जखमी (Injured) झाली होती. मुलीच्या वडिलांनी तोफखाना ठाण्यात गुरुवारी (दि. 12) फिर्याद दिली. शुक्रवारी दुपारी तरुणीचा मृत्यू (Young Woman Death) झाला.

एएमटी बसच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू
भीषण अपघात : कंटेनरने दुचाकीला १०० फुटापर्यंत फरफटत नेलं, एकाचा जागीच मृत्यू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com