मतीमंद युवतीचा चुलत्यानेच घेतला गैरफायदा

नराधम पाच महिन्यांनी जेरबंद
मतीमंद युवतीचा चुलत्यानेच घेतला गैरफायदा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मुकबधीर व मतीमंद युवतीवर अत्याचार करणारा नराधम तीचा चुलताच निघाला. पाथर्डी पोलिसांनी पाच महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अत्याचारी शोधुन काढला. साहेबराव लक्ष्मण शिंदे (72) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तालुक्यातील एका गावात मतींमंद व मुकबधीर युवतीचे पोट दुखु लागल्याने तिला कुटुंबियांनी दवाखान्यात नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यावरून 2 मार्च 2022 रोजी युवतीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मुलगी मतीमंद असल्याने तीला काहीच बोलता अथवासांगता येत नव्हते. यामुळे या घटनेचा तपास करणे पोलिसासमोर कडवे आव्हान होते. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायय्क पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, सागर मोहीते यांनी या प्रकरणाचा तपास केला. पिडीत मुलीला बोलता येत नव्हते. ऐकु येत नव्हते व ती मतीमंदही होती.पोलिसांनी मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षक घेवुन तपास केला.

सुमारे वीस लोकांचे रक्ताचे नमुणे घेवुन नाशिक येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठविले. संशयित शिंदे याचे नमुने घेतल्यापासुन त्याचे वागने संशयास्पद असल्याचे पोलिसांना जाणवले होते. त्याच्यावर लक्ष ठेवले गेले. अखेर रविवारी नाशिकच्या प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यामधे साहेबराव शिंदे हाच मुलीला गर्भवती करणारा संशयित असल्याचे उघड झाले. पोलिसांनी शिंदे याला तात्काळ अटक केली. सोमवारी शिंदे याला न्यायाधीश व्ही.आय.शेख यांच्यासमोर हजर केले. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शेख यांनी दिले आहेत.

कडक शिक्षेची मागणी

मतीमंद मुलीवर अत्याचार करणारा 72 वर्षे वयाचा नराधम पोलिसांनी शोधुन काढल्याने पोलिसांचे कौतुक होत आहेत.स्वताःच्या मुलीच्या वयाची असलेली पुतणी तीही मुकबधीर व मतीमंद व त्याचा फायदा घेणारा नराधम पोलिसांनी शोधुन काढला त्याला न्यायालयाने कडक शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीतीचे नातेवाईकांनी तसेच सामाजिक संघटनांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com