आईच्या आजारपणाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार

तरूणाविरूध्द तोफखाना पोलिसांत गुन्हा
Crime news
Crime news

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आईच्या आजारपणाचा फायदा घेत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळची नाशिकची व सध्या नगर शहरात राहणार्‍या पीडित तरूणीने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून अतुल मोहन अपील (रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केले आहे. सन 2015 पासून 1 मे, 2023 पर्यंत वेळोवेळी ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सन 2015 मध्ये फिर्यादी तरूणीची आई आजारी असल्याने तिला मदतीची आवश्यकता होती. त्यावेळी अतुल तिला म्हणाला,‘मी तुझ्या आईच्या दवाखान्याचा सर्व खर्च करतो, परंतू मी जे सांगेल ते तुला करावे लागेल’, असे म्हणून त्याने आईच्या आजारपणाचा फायदा घेत तरूणीवर वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले.

त्याच्यापासून तरूणीने दोन मुलांना जन्म दिला. तरी देखील त्याने तरूणीसोबत लग्न न करता फक्त लग्न करण्याचे आमिष दाखवून संबंध ठेवले. पीडिताने त्याला विरोध केला असता तो तिला मारहाण करीत असे व बदनामी करेल, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत असे. पीडिताने या प्रकरणी मंगळवारी (दिनांक 2 मे, 2023) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतुल मोहन अपील विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com