राहुरी (प्रतिनिधी)-

लग्नाला नकार दिला म्हणून राहुरी शहरातील 19 वर्षीय तरुणीला पाचजणांनी लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तिचे अपहरण करून

आरोपी सुरज घनघाव याच्यासोबत पळवून लावले. ही घटना दि. 4 जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी राहुरी, राहाता व शिर्डी येथील सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, काही दिवसांपूर्वी मिना घनघाव हिने मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. त्या लग्नाला आम्ही नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपी मीना घनघाव, विजय गायकवाड दोघे राहणार शिर्डी, तालुका राहाता व रवी राजेंद्र साळवे, ज्योती रवी साळवे दोघे राहणार क्रांतिचौक, राहुरी तसेच अनिल चांगदेव लोंढे राहणार राहाता, या पाचजणांनी मिळून मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. दि. 4 जानेवारी 2021 रोजी तिचे अपहरण करून सुरज घनघाव याच्यासोबत पळवून लावले.

याबाबत सुरज घनघाव, मीना घनघाव, विजय गायकवाड, रवी राजेंद्र साळवे, ज्योती रवी साळवे, अनिल चांगदेव लोंढे या सहाजणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहा आरोपींपैकी रवींद्र साळवे व अनिल लोंढे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दि. 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इतर चार आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र डावखर करीत आहेत.