तरसाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

तरसाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

आठवड्यातील दुसरी घटना

सुपा | वार्ताहर

पारनेर तालुक्यात व परिसरात बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग दहशतीखाली आसताना आता तरसानीही परिसरात धुमाकुळ घालण्यास सुरवात केली आहे.

आठ दिवसांपुर्वी तरसाच्या हल्यात उत्तम औटी या ५९ वर्षीय वृद्धचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पुणेवाडी फाटा येथील राजेंद्र सीताराम पुजारी (वय ४०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तरसाने हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. प्रंसगावधान राखुन राजेंद्र याने प्रतिकार केल्याने या दुर्घटनेत प्राण वाचले.

Title Name
१५ मे पर्यंत दुचाकीवर डबल सीट बंदी
तरसाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

दरम्यान घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर विभागाचे वनपाल संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याने हल्ला केल्याचे राजेंद्र सांगत होते तर वनपाल संदीप भोसले यांच्या मते बिबट्या दिवसा हल्ला करीत नाही. तरस आशा पद्धतीने हल्ला करून मानवास जखमी करीत त्यास भक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो.

परीसरातील डोंगरांमध्ये तरसाचे वास्तव्य आहे. भक्ष्याच्या शोधात फिरताना ते मानवालाही लक्ष्य करतात. दरम्यान वनविभागाच्या वतीने राजेंद्र याचा जबाब नोंदविण्यात येणार असून त्याच्यावरील उपचार तसेच शासकीय मदतीसंदर्भातील प्रस्ताव वरीष्ठाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Title Name
बिबट्याचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी
तरसाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

बिबटे, तरस या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकाची मागणी

पारनेर शहरालगतच्या परिसरात वन्य प्राण्यांची मोठी दहशत आहे. आता तरसही नागरिकावर हल्ले करु लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.आठ दिवसापुर्वी एका शेतकऱ्याचा तरसाच्या हल्यात बळी गेला. त्यानंतर राजेंद्र पुजारी हे देखील तरसाच्या हल्यात बालबाल बचावले आहेत. त्यांनी प्रंसगावधान दाखविले नसते तर त्यांनाही प्राणास मुकावे लागले असते. वनविभागाने या दोन्ही घटनांपासून बोध घेऊन हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com