विहिरीत उडी घेवून युवकाने संपवली जीवन यात्रा

विहिरीत उडी घेवून युवकाने संपवली जीवन यात्रा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) निमगाव गांगर्डा (Nimgav Gangarda) येथील युवकाने विहिरीत उडी घेवून (young man jumped into the well) आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. गोविंद सटाले (वय 27 वर्षे) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या युवकाचे नाव आहे. गोविंद हा नगर येथे नोकरी (Job) करत होता. या घटनेने निमगाव गांगर्डामध्ये शोककळा पसरली आहे. त्याने आपल्या मालकास मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली. त्यामध्ये घरच्या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक तसेच आत्महत्या (Suicide) करणार असल्याचे ठिकाण लिहिले होते.

दिलेल्या क्रमांकावर नातेवाईकांना संपर्क करण्यास सांगून गोविंदने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक रवींद्र वाघ, वैभव सुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. विहिरीला पाणी असल्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास ग्रामस्थांना अडचणी येत होत्या. शेवटी पथकास पाचारण करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर निमगाव गांगर्डा येथे शोकाकूल वातावरणात गोविंदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com