नेवासा येथील तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

नेवासा येथील तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर रेल्वे स्टेशन ते पढेगाव स्टेशन या दरम्यान मातापूर शिवारात एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. भारत मोहन बर्डे (वय 40, रा. साईनाथनगर, नेवासा) असे या तरूणाचे नाव आहे.

त्याने रेल्वे क्रमांक 21804 या रेल्वे गाडीखाली स्वतःची जीवनयात्रा संपवली. यावेळी रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वे स्थानक यांनी दिलेल्या माहीतीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र.40/2021 नुसार भादंवि कलम 174 नोंद करण्यात आली आहे.

मयत भरत बर्डे याच्या खिशात सापडलेला रोजगार हमी योजनेच्या कार्डवरुन त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरिक्षक़ संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. पो. ना. दुथाडे हे पुढील तपास करीत आहेत. दहा दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड भागात एका तरुणाने लॅाकडाऊनमध्ये काम गेल्याने गळफास घेवुन आत्महत्या केली होती. भरत बर्डे याने देखील रोजगार हमीचे काम गेल्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com