श्रीरामपूरात इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

श्रीरामपूरात इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू
Sarvmat_Update

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर असलेल्या साई सुपर मार्केटच्या इमारतीवरुन एक तरुण पडल्याने त्याचा जागीर मृत्यू झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावल्याने पुणे येथे कामास असलेल्या अभिजित दिपक सुखदरे (वय 24) हा श्रीरामपूर येथे आलेला होता. लॉकडाऊन असल्यामुळे अभिजित हा त्याच्या मित्रांबरोबर साईसुपर मार्केटच्या गच्चीवर जावून बसलेले होते. मात्र पोलिसांच्या गाडीचा सायरन आवाज ऐकू आल्याने पोलीस वर येवून आपल्यावर कारवाई करतील म्हणून घाबरुन जावून इमारतीच्या गच्चीवर असलेल्या एक़ा कोपर्‍यात जावून लपण्याच्या नादात अभिजितचा पाय हा प्लॅस्टिक शिटवर पडला आणि अभिजित हा सरळ खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याला पहाण्यासाठी गर्दी जमली होती. अभिजितला तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो मृत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

अभिजित याच्या पश्चात चौघे बंधू व आई असा परिवार आहे. अभिजित हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता. अभिजीत हा तरुण गणेश उत्सव ,नवरात्र उत्सव तसेच इतर धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर होता. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांच्या पोलीस पथकाने येवून गच्चीवर जावून पहाणी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व कार्यकर्त्यांनी अभिजितला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com