झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

‌पोलिसांमुळे मृतदेहाची अवहेलना

राहुरी | प्रतिनिधी

राहूरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गा लगतच्या एका शेतात नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथील सुनील कांतीलाल गायकवाड (वय-२८) या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्यामागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. याबाबत सविस्तर माहिती राहूरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत गट नंबर ७४० मधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास सुनील कांतीलाल गायकवाड (वय-२८, रा.मक्तापुर, ता.नेवासा, ह.मु.राहूरी फॅक्टरी) या तरुणाने रविवारी पहाटे ४ नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्याग्रस्त तरुणाचा चुलत भाऊ बाळासाहेब बन्सी गायकवाड हा बांधकाम क्षेत्रात मोलमजुरीचे करीत होता. त्याच्याकडे मयत सुनील हा दोन दिवसापूर्वी पुणे येथून आला असता त्याच्या चुलत भावास अनैतिक संबंधातील सर्व माहिती सांगून त्या मुलीच्या घरचे मला जीवे मारतील त्यामुळे मला भीती वाटत आहे. रात्रभर मयत सुनील याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पहाटे ३ वाजेच्या नंतर चुलत भाऊ व त्यांच्या घरातील व्यक्ती झोपी गेले असता मयत सुनील याने घरातून बाहेर पडून नगर-मनमाड महामार्गालगत गट नंबर ७४० मधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात आली. दरम्यान सकाळी ७ वाजता नागरीकांनी मृतदेह लटकेल्या अवस्थेत पाहिला. स्थानिक नागरीकांनी या घटनेची माहिती ताबडतोब राहूरी पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना अरेरावी

‌घटनास्थळी वृत्त संकलन करण्यासाठी ४ ते ५ पत्रकार आले असताना घटनास्थळी आत्महत्येची माहिती घेत असताना देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलिस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांनी पत्रकारांना अरेरावी करत घटनास्थळावर नागरीकांपेक्षा पत्रकारांची गर्दी जास्त होते. वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना घटनास्थळावरुन हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पत्रकरांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तक्रार केली. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक व दोन होमगार्ड अवैध धंदे चालक यांच्या समवेत बैठक मारून तपासी अंमलदाराची वाट पाहत होते. यावेळी कोणी किती धंदा केला याची माहिती फाटक घेत असताना नागरीकांसह ऐकले व कानावर विश्वास बसेना. सदर पोलीस कर्मचारी गणेश फाटक राहूरी फॅक्टरी येथील काही घटना घडल्यानंतर आमचे हद्द नाही असे सांगून तक्रारदारांना राहूरी फॅक्टरी बीट अंमलदाराकडे पाठविले जाते. मात्र राहूरी फॅक्टरी येथील आत्महत्येची घटना घडल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल फाटक यांना हद्दीची आठवण राहिली नाही का? असा प्रश्न यावेळी उपस्थित नागरीकांनी केला.

‌पोलिसांमुळे मृतदेहाची अवहेलना

‌राहूरी फॅक्टरी येथे पहाटे ४ वाजता सुनील गायकवाड याने आत्महत्या केल्यानंतर सदर घटना सकाळी ७ वाजता उघड आली. जागरूक नागरीकांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात व राहूरी फॅक्टरीचे बीट अंमलदार डी. के.आव्हाड भ्रमणभाष जागरुक नागरीकांनी घटनेची माहिती दिली. सुमारे ५ तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आत्महत्याग्रस्त सुनीलचा चुलत भाऊ बाळासाहेब याने आक्रोश करून माझ्या भावाचा मृतदेह खाली तरी उतरवा अशी पोलिसांना विनंती करीत होता. उपस्थित असलेले देवळाली प्रवरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस गणेश फाटक यांनी ही हद्द माझी नाही तर पोलीस हेड कॉन्स्टेबल आव्हाड यांची असून ते आल्यानंतर मृतदेह खाली घेण्यात येईल. मी मात्र नगर-मनमाड मार्गावर गस्तीवर असताना घटना कळाली म्हणून पाहण्यासाठी आलो असे सांगून आव्हाड आल्यानंतर सोपस्कार होतील असे सांगून फाटक यांनी काढता पाय घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com