तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण, दोघांवर गुन्हा

तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण, दोघांवर गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - दोघांनी एका तरूणास लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. युवराज अरूण खेत्रे (वय 30 रा. बुरूडगाव रोड, नगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी खेत्रे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे कृष्णा सरोदे, गणेश शिंदे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात भादंवि कलम 325, 323, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सावेडीतील भिडे चौक येथे ही घटना घडली. युवराज खेत्रे भिडे चौक येथे कामानिमित्त गेले होते. त्यांच्या दोन मित्रासोबत ते गप्पा मारत असताना त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या सरोदे व शिंदे यांनी खेत्रे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

शिवीगाळ करण्याचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या खेत्रे यांना सरोदे व शिंदे यांनी लाकडी दांडके, लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत खेत्रे यांच्या हाताला, तोंडाला मार लागला आहे. तसेच त्यांच्या बोटातील अंगठी गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com