तरूणीवर आळीपाळीने अत्याचार

भिंगारमधील घटना || पाच जणांविरूध्द गुन्हा
तरूणीवर आळीपाळीने अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरुणीला वाहनातून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना शनिवारी भिंगारमधील काटवनात घडली. यासंदर्भात नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित तरुणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

इम्रान शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मुकुंदनगर), शहानु शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बाराइमाम, कोठला), रिक्षा चालक अकरम ऊर्फ अरशद (रा. झेंडीगेट), बाशीद मुक्तार खान (रा. लिंक रोड, केडगाव) व केडगाव उपनगरात राहणारी एक महिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

वरील पाच आरोपींनी पीडित फिर्यादी तरुणीला बळजबरीने रिक्षातून गोंविदपुराच्या पुढे काटवनात नेले. पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महिलेने पीडितेचे हात धरले व इतर आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com