युवा अभियंता चोपडा यांच्या घातपाताचा संशय!

सखोल चौकशी करण्याची शहरातील व्यापार्‍यांची मागणी
युवा अभियंता चोपडा यांच्या घातपाताचा संशय!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) युवा अभियंता आदित्य चोपडा यांच्या मृत्यूबाबत (Death of young engineer Aditya Chopra) संशय निर्माण होत आहे. सदर घटना ही घातपात तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे सदर मृत्यूच्या तपासाची सखोल चौकशी (Inquiry) करून चोपडा कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा, तपासामध्ये दिरंगाई व दिशाभूल केल्याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्याचे (Supa Police Station) पोलीस निरीक्षक गोकावे (Police Inspector Gokave) यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशा मागणीचे निवेदन शहराचे आ. संग्राम जगताप (MLA Sangram jagtap) व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांना देण्यात आले.

यावेळी प्रा. माणिकराव विधाते, सुवेंद्र गांधी, सुमित वर्मा, विपुल शेटिया, संजय चोपडा, अजय मुथा, अजय बोरा, अमित मुथा, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, विजय गव्हाळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अमित मुथा, राजेंद्र गांधी, सफल जैन, कमलेश भंडारी, धनेश कोठारी, अभिषेक दायमा, बाबासाहेब सानप, सागर सुरकुरिया आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, आदित्य चोपडा हे आत्महत्या करतील असे काहीच कारण नव्हते. त्यामुळे सदरची घटना ही आत्महत्या नसून हा घडवून आणलेला घातपात आहे, पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून सदर कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.

यावेळी अधीक्षक पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Related Stories

No stories found.