इंजेक्शन घेऊन तरुण डॉक्टरची आत्महत्या

इंजेक्शन घेऊन तरुण डॉक्टरची आत्महत्या

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत (Karjat) तालुक्यातील मिरजगाव (Mirajgav) येथील डॉ. विश्वास कवळे (dr. Vishwas Kawale) यांनी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (30 जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी ही घटना घडली.

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. कवळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. आपण आपल्या आजाराला कंटाळून आत्महत्या (suicide) करत असल्याचे त्यात लिहिले आहे. डॉ. विश्वास कवळे यांनी वैद्यकिय पदवी घेतल्यानंतर मिरजगावमधील राहत्या घरात आपली वैद्यकीय सेवा सुरू केली होती. डॉ. विश्वास हे मिरजगावच्या नूतन उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक अर्जुन कवळे यांचे चिरंजीव होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com