
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
श्रीक्षेत्र कोकमठाण येथे 2 ऑगस्ट पासून सुरु होत असलेल्या सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. ना. गडकरी यांनी या सप्ताह काळात येऊन भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
सप्ताह समितीचे उपाध्यक्ष संभाजी रक्ताटे, महेश लोंढे, नंदकिशोर पवार, भाऊसाहेब शिंदे या सप्ताह समितीच्या सदस्यांनी ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्यासमवेत ना. नितीन गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना सर्व रुपरेषा सप्ताह कमिटीच्यावतीने सांगण्यात आली.
त्यावर ना. गडकरी यांनी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या विषयी असलेला आदर व श्रध्दा यामुळे जागतिक महामारी करोनानंतर होणार्या अशिया खंडातील सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहू, व सहकार्य करु असे सांगून त्यांनी सप्ताहास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सप्ताह समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम व उपाध्यक्ष संभाजी रक्ताटे यांनी दिली.