योगीराज चांगदेव महाराजांचे समाधी मंदिर भाविकांसाठी खुले

योगीराज चांगदेव महाराजांचे समाधी मंदिर भाविकांसाठी खुले

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

श्रीक्षेत्र पुणतांबा येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेले महान योगीराज चांगदेव महाराज यांचे समाधी मंदिर राज्य सरकारच्या निर्णयामुळे कालपासून भाविकांना दर्शनासाठी खुले केल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद ठेवण्यात आले होते. काल सकाळी पाच वाजता चांगदेव महाराज देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण यांनी समाधी स्थळावर विधीवत अभिषेक तसेच महापूजा केल्यानंतर भक्तांना शासनाच्या नियमाच्या अधिन राहून दर्शनासाठी प्रवेश देणे सुरु केल्यानंतर भाविकांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेतला. तोंडावर मास्क घालून तसेच गर्दी न करता भाविकांनी सकाळपासूनच गोदावरी नदीपात्रात गंगास्नानाचा लाभ घेऊन दर्शनासाठी रिघ लावली होती.

कालपासून नवरात्र उत्सव सुरु झाल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेले याज्ञसेनी देवीचे मंदिर सुद्धा भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. यज्ञातून प्रकट झाली म्हणून या देवीला याज्ञसेनी देवी असे म्हटले जाते. नवरात्र महोत्सवास देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. शासनाच्या नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी देवीचे मंदिर खुले केल्याची माहिती पुजारी श्री. बिडवाई यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.