दोघा भावांवर हाफ मर्डरचा गुन्हा

युवासेनेचे गलांडे यांना केली होती मारहाण
दोघा भावांवर हाफ मर्डरचा गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश चंद्रकांत गलांडे (वय 39 रा. संघर्ष चौक, सावेडी गाव) यांना 13 मार्च रोजी एमआयडीसीतील भळगट कॅन्टीनजवळ झालेल्या मारहाण प्रकरणी दोघा भावांवर भादंवि कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी योगेश गलांडे यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 20 मार्च रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे.

किरण दंडवते उर्फ चिन्या, आकाश दंडवते उर्फ चिट्या (दोघे रा. सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. योगेश गलांडे व आकाश दंडवते यांची दोघांची पार्टनरशीपमध्ये एमआयडीसीत एस. आर. इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्या कंपनीत प्लास्टीक मोल्डींगचे उत्पादन होते. दरम्यान या पार्टनरशीपमधील कंपनीची त्यांना विभागणी करायची असल्याने त्यांच्यात नातेवाईकांनी मध्यस्थी केली होती.

10 मार्च रोजी त्यांच्यात कामगाराच्या पगारावरून वाद झाले होते. 13 मार्च रोजी दुपारी गलांडे हे भळगट कॅन्टीनमध्ये चहा पित असताना चारचाकी वाहनातून आलेल्या आकाश व किरण यांनी योगेश गलांडे यांना शिवीगाळ केली. आकाशने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com