योग साधनची परंपरा पंतप्रधानांनी जगात पोहचविली- ना. विखे

योग साधनची परंपरा पंतप्रधानांनी जगात पोहचविली- ना. विखे

राहाता |प्रतिनिधी|Rahata

योग (Yoga) साधनेची परंपरा आणि संस्कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Level) पोहोचविली. मानवी मनाची एकाग्रता, स्वास्थ्य आणि आनंद या साधनेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Level) या साधनेचे आधोरेखित झालेले महत्व पाहता भारताने जगाला अमुल्य ठेवा दिला असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil) महाविद्यालयात सामुहीक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय टंडन, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. योगाचार्य संजय चोळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगाची प्रात्यक्षिक केली.

योग साधनची परंपरा पंतप्रधानांनी जगात पोहचविली- ना. विखे
दर्शना पवार हिचा खूनच

याप्रसंगी ना. विखे पाटील म्हणाले, 9 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योग साधनेला आंतरराष्ट्रीय स्तराववर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आज जगातील 177 देशांमध्ये ही योग साधना केली जात आहे. संपूर्ण जगात या योग साधनेचे महत्व विषद झाले आहे. यंदाच्या योगदिनाची संकल्पना ही वसुधैव कुटूंबकम् अशी होती. त्यामुळेच आता संपूर्ण विश्व या साधनेशी जोडले गेले आहे. मानवी मनाची एकाग्रता, स्वास्थ्य आणि आनंद या साधनेतच दडलेले असल्यामुळे भारताने जगाला दिलेला हा अमुल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा नेते संजय टंडन म्हणाले, योग साधना हा व्यायाम प्रकार नसून आत्मा आणि शरीर यांना बळकट करण्याची साधना आहे. देशाची ही संस्कृती, परंपरा आज जगामध्ये पोहोचली आहे. याचा सर्वांनाच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

योग साधनची परंपरा पंतप्रधानांनी जगात पोहचविली- ना. विखे
नगर जिल्ह्याला 241 कोटींची मदत
योग साधनची परंपरा पंतप्रधानांनी जगात पोहचविली- ना. विखे
तक्रार का घेतली? म्हणत महिलेचा पोलीस ठाण्यातच जाळून घेण्याचा प्रयत्न
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com