येसगाव येथील बाळासाहेब नरोडे यांचे अपघाती निधन

येसगाव येथील बाळासाहेब नरोडे यांचे अपघाती निधन

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील येसगाव येथील प्रगतशील शेतकरी व दुग्धव्यवसायीक बाळासाहेब सुकदेव नरोडे (वय 52) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक विवाहीत मुलगी, जावई असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे कर्मचारी रमेश तसेच सुभाष व विलास नरोडे यांचे ते बंधू होते.

कै. बाळासाहेब नरोडे यांच्यावर सुरुवातीला फडके हॉस्पीटल कोपरगाव तर नंतर नाशिक येथील अशोका रुग्णालयात उपचार करण्यात आले.

शुक्रवारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कै. बाळासाहेब यांच्या पार्थिवावर येसगाव येथे शोकाकुल वातावरणात शुक्रवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेते दत्तात्रेय कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदींनी श्रद्धांजली वाहिली, याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com