पारनेर (तालुका प्रतिनिधी) -

श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोठा येथे 28 जानेवारी ते 30 जानेवारीला होणारी यात्रा करोनामुळे जिल्हा प्रशासनाची परवानगी

नसल्याने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात्रेबाबत देवस्थान समितीची विशेष बैठक 8 जानेवारीला देवस्थान कार्यालयात अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात्रेला जिल्हा प्रशासनाकडून करोनामुळे परवानगी नसल्याने यात्रा रद्द करण्यात आली असल्याचा ठराव सर्व उपस्थित विश्वस्तांच्या संमतीने करण्यात आला.

तरी यात्रेला येणारे लहान मोठे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, भाविक, भक्त यात्रेकरुंनी यात्रेला येऊ नये. करोनाचे नियम पाळावेत तसेच देवस्थान जवळ दुकाने लावू नयेत. दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, डी.वाय.एस.पी. अजित पाटील, तहसिलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी आणि देवस्थानतर्फे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, खजिनदार हनुमंत सुपेकर, सचिव महेंद्र नरड, सहसचिव मनीषा जगदाळे, विश्वस्त किसन धुमाळ, आश्वीनी थोरात, अमर गुंजाळ, किसन मुंढे, मोहन घनदाट, चंद्रभान ठुबे, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देवीदास क्षीरसागर, साहेबा गुंजाळ यांनी केले आहे.