ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त सोनई परिसरात विविध सामाजिक उपक्रम

मोरेचिंचोरे येथे यशवंत वनराई नर्सरी प्रकल्पाचे उद्घाटन
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त सोनई परिसरात विविध सामाजिक उपक्रम

सोनई |वार्ताहर| Sonai

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अभीष्टिचिंतनानिमित्त सोनई व परीसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मुख्य कार्यक्रम आदर्शगाव मोरेचिंचोरे येथे यशवंत वनराई नर्सरी प्रकल्पाचे उद्घाटन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

मोरेचिंचोरे येथे यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या संकल्पनेतून उभ्या असलेल्या टेकडी परीसरात उदयन गडाख यांच्या हस्ते 50 हजार देशी झाडांची निर्मिती करणार असलेल्या यशवंत वनराईचे उद्घाटन करण्यात आले. 80 जेष्ठ ग्रामस्थांच्यावतीने 80 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.सर्वांना प्रशस्तीपत्र व ग्रंथभेट देवून सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक महेश मापारी यांनी केले. अजिंक्य लिंगायत, श्रीकांत येळवंडे, जालिंदर येळवंडे, भैय्यासाहेब देशमुख, तुकाराम नवले यांची शुभेच्छापर भाषणे झाली.

प्रमुख भाषणात उदयन गडाख यांनी गडाख साहेब यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून रचलेला पाया आज तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावणारा ठरल्याचे सांगितले. ज्येष्ठांची साथ आजही त्याच जोमात असल्याने संघटना अधिक बळकट असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण तालुक्यात यशवंत वनराईचा उपक्रम राबविण्यात येवून पर्यावरणाचे मोठे काम करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जगदंबादेवी सभागृह - सोनई येथील जगदंबादेवी सभागृहात स्नेह फाऊंडेशनच्या आनंदवन व ध्यान मंदीराचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक संजय गर्जे यांनी केले. डॉ. बाबासाहेब शिरसाठ, शिवाजी बाफणा, डॉ.हेमा वैरागर यांची भाषणे झाली.शनिश्वर विद्यालय येथे माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक दरंदले, संकेत दरंदले, सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय - कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यकीय महाविद्यालय, नवसारी (गुजरात) डॉ. आण्णासाहेब फुलसौंदर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृद विज्ञान विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. पोपट कडू, प्राचार्य, डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदिप तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे वृक्षारोपण करण्यात आले.

सोनई महाविद्यालय - सोनई महाविद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.प्राचार्य शंकर लावरे, प्रशासन अधिकारी डॉ.अशोक तुवर यांचेसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मुळा कारखाना येथे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मोरेचिंचोरे येथील कार्यक्रमास मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, नानासाहेब रेपाळे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, दगडू इखे, जबाजी फाटके, सरपंच जयश्री मंचरे, दादासाहेब राजळे, बन्सी ढेरे, शिकारे गुरुजी, एकनाथ गडाख, पांडुरंग अनारसे, मदन भळगट, कन्हैयालाल चंगेडिया, उत्तमराव लोंढे, भाऊसाहेब गवळी उपस्थित होते.

दोन महावृक्षांमुळे तालुक्याचा विकास

आज वृक्षारोपण कार्यक्रम होत असले तरी तालुक्याच्या विकासात स्व. मारुतराव घुले पाटील व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख महावृक्ष आहेत. त्यांच्या योगदानातून उभ्या राहिलेल्या संस्थांमुळे सर्वच गावांना आज विकासाची सावली भेटत असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम नवले यांनी सांगितले.

‘यशवंत वनराई’साठी मदत

यशवंत वनराई हा उपक्रम पर्यावरणासाठी उपयुक्त असल्याने सोनई येथील उद्योजक दीपक धनवटे यांनी या विधायक उपक्रमासाठी 91 हजारांची मदत दिली. या देणगीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

Related Stories

No stories found.