यशवंत पाणी उपसा योजनेचे पाईप लंपास

पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद
यशवंत पाणी उपसा योजनेचे पाईप लंपास

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील कर्‍हेटाकळी येथील बंद स्थितीत असलेल्या यशवंत उपसा जलसिंचन सहकारी संस्थचे 24 सिमेंट पाईप चोरीला गेले होते. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पाच जणांना ताब्यात घेऊन सुमारे 15 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अलिम हसन शेख (36, रा. कर्‍हेटाकळी, ता.शेवगाव ) व वैभव ज्ञानेश्वर जाधव (22, रा. दहिगाव ने ता. शेवगाव ) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे तर या गुन्ह्यातील फरार आकाश राजु पवार, विष्णु भानुदास राठोड, राजु बाबुलाल चव्हाण ( सर्व रा. कर्‍हेटाकळी ता.शेवगाव ) यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मे ते 14 जुन दरम्यान घडली. गावातील यशवंत उपसा जलसिंचन सहकारी संस्थे अंतर्गत जायकवाडी धरणातुन कहेटाकळी येथे पाईपलाईन करुन शेतीसाठी पाणी आणले होते.

ही पाईप लाईन सुमारे पाच वर्षापासुन बंद आहे. यातील े24 सिमेंट पाईप हे कर्‍हेटाकळी गावचे शिवारातील शेत गट नं 34 मधुन संगनमताने संशयितांनी जेसीबी व एक ट्रॅक्टरचे मदतीने चोरुन घेवुन गेले अहेत. शेवगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास पुजारी, स.पो.नि. आशिष शेळके, स.पो.नि. विश्वास पावरा, स. पो. नि. रविंद्र बागुल व पोलीस अंमलदार यांनी संशतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 11 सिंमेटचे पाईप पोलीसांनी हस्तगत केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com