सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्षम व्यक्तीमत्व असून त्यांना तालुक्यातील संघटनेची ताकद व कार्यकर्त्यांचे पाठबळ दिसल्यामुळेच

शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील गिडेगाव येथे भव्य नागरी सत्कार संमारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकराव गडाख, ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, मुळा कारख्यान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले तसेच जिल्हा बँक, ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यात बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यशवंतराव गडाख पुढे म्हणाले, आज तालुक्यात 40 लाख टन ऊस उभा आहे. स्व. मारुतराव घुलेंबरोबर काम करताना जिल्हा बँकेतून तालुक्यातील शेतकर्यांना पाईपलाईनसाठी कर्ज उपलब्ध करून दिले म्हणून या बॅकवॉटर भागाचा विकास होऊन समृद्धी नांदत आहे.

नरेंद्र घुले म्हणाले, स्व. मारुतराव घुले व यशवंतराव गडाख यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून गेली चाळीस वर्ष तालुक्यातील सर्व संस्था व्यवस्थित चालवल्या. ती परंपरा कायम राखण्याच काम आम्ही करू. जायकवाडी पाणी परवान्याचे अठरा वर्षाचे नुतनीकरण करणे गरजेचे असून शेतकर्यांनी ते करावे.

यामध्ये शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. पाटपाण्याचे नियोजन व्यवस्थित होत असून विज, पाणी, रस्ते शेतकर्यांसाठी महत्वाचे असून नामदार शंकरराव गडाख यावर सकारात्मकपणे काम करत असल्याचे सांगत त्यांनी ना. गडाखांचे कौतुक केले.

ना. गडाख म्हणाले, दोन्ही कारखान्याच्या निवडणूका बिनविरोध करण्यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी कायम फ़सवाफसवी केली. आमदारकीच्या निवडणूकीत संपूर्ण तालूका एकाबाजूला असताना व आमच्या बरोबर असणारे ऐनवेळी दुसर्याची धुणी धुवायला गेले. तिकडं काय मिळालं? असा सवाल ना. गडाख यांनी उपस्थित करत समोरासमोर लढण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पाडुरंग अभंग, अनिल मते, श्रीरंग हारदे, देसाईआबा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सरपंच भगवान कर्डिले यानी केले.

कार्यक्रमास ज्ञानेश्वर वाफारे, जि . प. सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, बाळासाहेब साळुंके, तुकाराम मिसाळ, भाऊसाहेब मोटे, नानासाहेब तुवर, नारायण लोखंडे, लक्ष्मण जगताप, जनार्दन कदम, काकासाहेब नरवडे, बापूसाहेब कर्डीले, फिलिप पवार, बबनराव भुसारी, काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, शिवाजी कोलते, मच्छिंद्र म्हस्के, नानासाहेब रेपाळे, बाबासाहेब भणगे, सोपान पंडित, बापूसाहेब जंगले, संजय जंगले, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब परदेशी, बबनराव दरंदले, दामोदर टेमक, योगेश म्हस्के, जबाजी फाटके, प्रभाकर कर्डिले, निलेश शेळके, रामकिसन शेळके, गणेश ढोकणे, अजहर शेख, सुनिल नजन, अंबादास गोरे, दिलीप मते, नानासाहेब नवथर, राजेंद्र विधाटे, महेंद्र परदेशी, निलेश पाटील, कडुबाळ गायकवाड, बाळासाहेब बनकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रेवणनाथ पवार यांनी केले तर मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले यांनी आभार मानले.

सत्तेत नेता आपला असल्याने विकासाचा बॅकलॉग सक्षमपणे भरून काढत ना. गडाखांची कामगिरी नेत्रदिपक असेल. त्यांना आमचे कायम सहकार्य राहील.
- नरेंद्र घुले पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर कारखाना

त्यांनी कायम फ़सवाफसवी केली. आमदारकीच्या निवडणुकीत संपूर्ण तालुका एकाबाजूला असताना आमच्याबरोबर असणारे ऐनवेळी दुसर्याची धुणी धुवायला गेले. तिकडं काय मिळालं? असा सवाल विठ्ठलराव लंघे यांचे नाव न घेता ना. गडाख यांनी केला. मंत्रीपदाची हवा डोक्यात जावू न देता शेतकरी हित व सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचेही ना. गडाख यावेळी म्हणाले.