विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची उत्थापन पूजा

यंदा मिरवणूक नाही
विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची उत्थापन पूजा

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज त्यांना निरोप दिला जात आहे. नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी श्रींची उत्थापन पुजा झाली. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी व मोजकेच भाविक उपस्थित होते. मंदिरात उत्थापन पूजा सुरू होण्यापूर्वी बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली. यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही. महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम कुंड तयार करून विसर्जनाची सोय केली आहे. याशिवाय प्रत्येक वार्डात महापालिकेची वाहन विसर्जनाची गणपती मूर्ती स्वीकारणार आहेत. हे कर्मचारी मूर्तीचे नंतर विधीवत विसर्जन करतील, असे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. महापालिकेचे वाहन घरोघरी जाऊन गणेश मूर्ती घेण्यासाठी सुरुवात झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com