अकोलेत होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त
अकोलेत होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

अकोले |प्रतिनिधी| Akole

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जागतिक स्तरावर विश्व आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदिवासी बहुल भागात आदिवासी समाज मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदिवासी समाजातील पारंपरिक वेश भूषा परिधान करून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. दरवर्षी प्रमाणे आदिवासी कृती समितीच्या वतीने अकोले शहरात मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्या कार्यक्रमांचे पूर्व नियोजन करण्यासाठी अकोले तालुक्यातील शासकीय विश्रामगृह अकोले येथे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ट नेते अशोकराव भांगरे, पं. स.चे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत या वर्षीचा कार्यक्रम विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरले. या कार्यक्रमात आदिवासी समाजातील विविध कलापथकांचा कामडी, फुगडी नृत्य, टिपरी नृत्य, जंगली डान्स, या सहित आदी कलापथकाचे सादरीकरण होणार असल्याने या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यातील नागरिकांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन होणार आहे.

अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात आदिवासी समाजातील प्रेरणास्थान आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जन्म स्थान असलेला अकोले तालुका आहे. या तालुक्यात आदिवासी कृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेला जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्रातील सर्वात मोठा कार्यक्रम अकोले शहरात होत असतो. मागील दोन वर्ष राज्यात करोना काळात अनेक निर्बंध असल्याने मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम झाला नाही मात्र गतवर्षी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी आदिवासी कृती समितीच्या वतीने जाहीर झाल्याने 9 ऑगस्ट रोजी अकोले शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

या दिवशी अकोले शहरातून आदिवासी समाजातील पारंपरिक वेश भुषा परिधान करून सवाद्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये आदिवासी समाजातील कला पथकांचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी कृती समितीच्या वतीने करण्यात आले. या बैठकीसाठी आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश पथवे, माजी गटशिक्षण अधिकारी मारुती लांघी, वाळीबा धोंगडे, बाबुराव अस्वले, अशोक माळी, मारुती शेंगाळ, बाळासाहेब मधे, राजू उघडे, आनंद गिर्‍हे, मुकुंद लहामटे, शेंडे मेजर, दिपक पथवे, मारुती सोमा मेंगाळ, भाऊसाहेब पारधी, मदन पथवे या सहित आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com