अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतात निष्पन्न होणार्या एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 40 टक्के रुग्णांमध्ये तंबाखूजन्य पदार्थच कारणीभूत आहेत.

तंबाखू सेवनामुळे मुख्यत: तोंडाचे व घश्याचा कॅन्सर उद्भवतो. लक्षणांचे आकलन झाल्यास कॅन्सरवर मात करणे शक्य झाले आहे.

4 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन म्हणून पाळला जातो. कॅन्सरबद्दल जनजागृती हे या दिवसाचे वैशिष्ट्य.यानिमित्त प्रतियश कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी कॅन्सर, त्याचे प्रकार आणि उपचार यावर प्रकाश टाकला. तोंडात पांढराचट्टा किंवा लालचट्टा (एरिथ्रोप्लेकिया) होणे किंवा तोंडाची उघडीप कमी होणे ही लक्षणे दिसत असल्यास भविष्यात कॅन्सरमध्ये रुपांतरीत होण्याचा धोका असतो. वेळेवर या व्याधींवर उपचार झाल्यास धोका बर्याच अंशी कमी होऊ शकतो. तोंडातील साधारण जखमा वेदनादायक असतात परंतु 5 ते 7 दिवसांत त्या भरतात. परंतु तोंडातील जखम 2 आठवड्यांपेक्षा अधिकवेळेत भरत नसेल व अल्पवेदनादायी असेलतर वेळेवर तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

घश्याचा कॅन्सरमध्ये प्रामुख्याने स्वरयंत्र (लॅरिक्स) व अन्ननलिका मार्ग (फॅरिंक्स) या ठिकाणचे कॅन्सर येतात. प्राथमिकस्तरावर उपचार झाल्यास 80 टक्के रुग्ण कॅन्सरमुक्त होतात. केवळ 20 टक्के रुग्णांनाच कॅन्सर पुन्हा उद्भवतो.

शिवाय एकाच प्रकारच्या उपचाराची गरज असते म्हणजे फक्त शस्त्रक्रिया किंवा फक्त रेडिएशन. खर्चाची व वेळेची बचत होते. शस्त्रक्रियेमध्ये कमी विदृपता येते किंवा खाण्यापिण्याचा वा बोलताना त्रासही अत्यल्पअसतो. तोंडातील कॅन्सरची जखम कितीही लहान असेल तरीही जखमेसोबत त्याबाजूच्या मानेतील ठराविक ईलसिकाग्रंथीही काढल्या जातात. शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या स्कॅनमध्ये मानेतलसिका ग्रंथी अगदी वाढली नसेल तरीही मानेची ही शस्त्रक्रिया आवश्यक आहे. तोंडाच्या कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया, तर घश्याच्या कॅन्सरमध्ये रेडिएशनहाच मुख्य उपचार असतो.

कॅन्सर उपचार आधुनिक झाले आहेत. जबड्याच्या कॅन्सरमध्ये विद्रुपता येण्याचा संभव असतो. त्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमुळे मात करता येते. कमीत कमी 4 वर्ष वय ते 85 वर्षीयवृध्द कॅन्सर रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. मात्र हे टाळण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आपण धुम्रपान, तंबाखु यांचे अतिसेवन टाळलेलेच योग्य ठरेल, असे ते म्हणाले.