थोरात कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे काम अंतिम टप्प्यात

थोरात कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे काम अंतिम टप्प्यात

संगमनेर (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सुरू करत असलेल्या नव्या ऑक्सिज निर्मिती प्लँट च्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्लांटमधून येत्या तीन चार दिवसांमध्ये ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात या प्लँटच्या उभारणीचे कामाची पाहणी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी केली. यावेळी समवेत व्हाईस चेअरमन संतोष हासे, कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, मिननाथ वर्पे, भाऊसाहेब शिंदे, अनिल काळे, विनोद हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदी उपस्थित होते.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवा ऑक्सिजन प्लँट निर्मितीचा निर्णय घेतला. तैवान येथून ही अद्ययावत मशिनरी मागवली असून यामधून दररोज अकराशे किलो ऑक्सिजन गॅसची निर्मिती होणार आहे. या प्लांट च्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या तीन-चार दिवसांमध्ये शासकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्लांट मधून ऑक्सिजनचे नियमित उत्पादन सुरू होणार आहे. यामुळे संगमनेर शहर व परिसरातील रुग्णालय आणि करोना रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले, थोरात कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. तालुक्यातील प्रत्येक सुखदु:खात कारखान्याचा सहभाग मोठा राहिला आहे. करोना संकटात थोरात कारखान्याच्या वतीने 500 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. याच बरोबर वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. ऑक्सिजनची कमतरता पाहून राज्याचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने नवा ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारणीचा निर्णय घेण्यात आला असून सर्व शासकीय पूर्तता करून येत्या तीन दिवसांमध्ये यामधून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com