चांगदेवनगर रेल्वे भुयारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

चांगदेवनगर रेल्वे भुयारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणतांबा (वार्ताहर) - पुणतांबा रेल्वे स्टेशन जवळील चांगदेवनगर येथील रेल्वे फाटकाजवळ जानेवारीपासून सुरू झालेल्या रेल्वेच्या भुयारी पुलाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या भुयारी पुलाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे काम पूर्ण होताच या भुयारी पुलाखालून तात्पुरती वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या दुचाकी वाहने व पायी जाणार्‍या ग्रामस्थांना ये-जा करता येते. नुकतेच या पुलाखालून गणपती फाट्याकडे दुचाकीवरून जाण्याचा अनुभव येथील काही ग्रामस्थ व पत्रकारांनी घेतला आहे. कारण गेल्या 2 महिन्यांपासून चांगदेवनगर येथील रेल्वे फाटक बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होत होती.

रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबरोबरच भुयारी पुलाच्या रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या भिंतीचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात भुयारी पुलाखाली पाणी साठू नये म्हणून त्याची जलदगतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्याचे कामही प्राधान्याने सुरू करणार असल्याचे भुयारी पुलाचे काम करणार्‍या ठेकेदाराच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले आहे. चांगदेवनगर येथील भुयारी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पुणतांबा येथील भुयारी पुलाचे कामही तातडीने सुरू केले जाण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com