झाडूकाम करणार्‍या महिलेचा विनयभंग

झाडूकाम करणार्‍या महिलेचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

झाडूकाम करणार्‍या 40 वर्षीय महिलेसोबत तरुणाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. भिस्तबाग चौक परिसरातील लालगुलाब कॉलनी रोडवर बुधवारी सकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी संबंधित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयूर आबासाहेब गायकवाड (रा. वाणीनगर, सावेडी) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी फिर्यादी महिला लालगुलाब कॉलनी रोडवर झाडूकाम करत होत्या. त्याठिकाणी मयूर गायकवाड आला.

त्याने फिर्यादी महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले व तू येथे झाडायचे नाही, असा दम दिल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. पानसरे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com