महिलांचा अभ्यास दौरा कृषी क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल - सौ. विखे

महिलांचा अभ्यास दौरा कृषी क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल - सौ. विखे

राहाता |वार्ताहर| Rahata

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या महिला सन्मान वर्षातच कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेला महिलांचा अभ्यास दौरा कृषी क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

कृषी विभाग, जनसेवा फाउ8डेशन, लोणी आणि सिंधुताई महीला प्रोड्युसर कंपनी अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रक्षेत्र भेट कार्यक्रमा निमित्त महिला शेतकर्‍यांसाठी पाच दिवसीय अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौर्‍याचा शुभारंभ शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे आदींसह सहभागी महीला उपस्थित होत्या.

शेतकरी महिला शेतात काम करताना अनेक समस्यांना तोंड देत असते हा दौरा त्याच्या ज्ञानात भर टाकणारा ठरला, असे सौ. विखे पाटील म्हणाल्या. नवे तंत्रज्ञान विकसित करावे पाच दिवसीय या दौर्‍यातून महिलांनी प्रक्रिया उद्योग, फळबाग फूलशेती, हंगामी पिके, पुरक व्यवसाय बघता येणार अस्लायाने याचा लाभ येणार्‍या काळात आपल्यासाठी आणि इतरांसाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.

या दौर्‍यामध्ये महिला कांदा, लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट, मांजरी, फूड पार्क कात्रज, सेंद्रीय शेती उत्पादक गट, भोर, सारे पाटील, पॉलीहाऊस प्रक्षेत्र, मसाले पीक संशोधन केंद्र , दापोली कृषी विद्यापीठ, तळेगांव दाभाडे आदी ठिकाणी भेटी देणार आहेत. यामध्ये संगमनेर, अकोले, राहाता आणि कोपरगाव येथील 60 महिला सहभागी झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com