महिला बचत गटांच्या दीपावली प्रदर्शनास जिल्हा परिषदेत प्रारंभ

महिला बचत गटांच्या दीपावली प्रदर्शनास जिल्हा परिषदेत प्रारंभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद (Zilla Parishad) व उमेद-राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने दीपावली (Diwali) निमित्ताने महिला बचत गटांनी (Women Self-Help Groups) उत्पादित केलेल्या वस्तू व फराळ यांचे विक्री प्रदर्शन जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रांगणात गुरूवारी सुरूवात झाली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ना. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील (Rajshritai Chandrasekhar Ghule Patil), जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती मीरा शेटे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय केदारे उपस्थित होते. ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील होतकरू महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या माध्यामातून आयोजित करण्यात आलेले आहे. उमेद अभियानातर्गत बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल व गुणवत्तापूर्ण वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उमेदच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 14 हजार स्वयंसहायता गटाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध उपजीविकेचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकारी यांनी उत्पादनांची खरेदी केली व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हे विक्री प्रदर्शनामध्ये (Sales Exhibition) महिला गटांनी उत्पादित केलेल्या रूचकर पापड, लोणचे, मसाले, पेढे, दीपावली फराळ, उटणे, शेवया इत्यादी चविष्ट पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध होत असून दीपावलीनिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी वृंदाने या ठिकाणी खरेदी करावी असे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (CEO Rajendra Kshirsagar) यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर तालुका तालुका व्यवस्थापक पंढरीनाथ ठाणगे, बाबासाहेब सरोदे, वैभव धनवटे, ज्ञानेश्वर गव्हाणे व इतर सर्व स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com