महिला आरक्षण विधेयक, नारीशक्तीचा सन्मान - स्नेहलता कोल्हे

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तीन दशकांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण (Women Reservation) विधेयक मंजूर करून नवा इतिहास रचला आहे. महिलांना लोकसभा (Loksabha) आणि राज्य विधानसभांमध्ये (Assembly) 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या या ऐतिहासिक विधेयकामुळे देशातील महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व मिळणार असून, हा क्रांतिकारी निर्णय घेऊन भाजप (BJP) व मोदी सरकारने नारीशक्तीचा मोठा सन्मान केला असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी व्यक्त केली.

स्नेहलता कोल्हे
नगर जिल्ह्यात महिला आमदारांची संख्या वाढणार?

स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) म्हणाल्या, महिला आरक्षणासंदर्भात देशात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. महिला आरक्षणाविषयी आजवर खूप चर्चा झाली, वादविवाद झाले. महिला आरक्षणाचे विधेयक संमत करून कायदा बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे 128 वे घटना दुरुस्ती विधेयक नारीशक्ती वंदन अधिनियम 2023 या नावाने नवीन संसद भवनात होत असलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडले आहे.

स्नेहलता कोल्हे
दुधासह दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट

महिलांना संसदीय राजकारणात समान संधी देण्याची तरतूद असलेल्या या विधेयकामुळे स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी आपल्या देशात समान संधीची पहाट होण्याची आशा पल्लवित झाली आहे. मोदी सरकारने महिलांना लोकसभा (Loksabha) आणि राज्य विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण (Reservation) देण्याची तरतूद असणारे विधेयक आणून क्रांतिकारी पाऊल उचलल्याबद्दल स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी मोदी सरकारचे तमाम महिलांच्या वतीने आभार मानले आहेत.

स्नेहलता कोल्हे
बनाव करून तीस लाखांचा लसूण परस्पर विकला
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com