नाईटच्या ड्युटी करू नको म्हणत महिलेवर अत्याचार

आरोपीस अटक; लोणी पोलिसांत गुन्हा दाखल
नाईटच्या ड्युटी करू नको म्हणत महिलेवर अत्याचार

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील हसनापूर परिसरात राहणार्‍या एका 35 वर्षे वयाच्या तरुण महिलेला तिच्या घरी जाऊन घरात बळजबरीने घुसून

अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याचेविरुध्द लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक नोकरदार तरुण महिला हसनापूर शिवारात राहते. तिच्या घरी जाऊन पोपट उर्फ पप्पू श्रावण शिंदे याने घरात घुसून तू नाईट ड्युटीला (रात्रपाळी) जाऊ नको, मी तुझी हजेरी लावतो, असे म्हणून परत येऊन तू फोनवर कुणाबरोबर बोलत होती, असे म्हणत महिलेला बळजबरी करून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

रात्री हा प्रकार घडला. आरोपी रात्री 9.30 ला महिलेच्या घरात घुसला तिला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मारहाण केली. तुला तुझ्या आई वडिलांना येईपर्यंत ा ठार मारुन टाकील, तू जर फोनवर कुणाला काही सांगितले तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोपट उर्फ पप्पू श्रावण शिंदे याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 452, 354 ड, 323, 506 प्रमाणे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी उपविभागाचे पोलीस अधिकारी संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी हे पुढील तपास करत आहेत. पीडित महिला ही एका मोठ्या रुग्णालयात नोकरी करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com