Women IPL टी-20 मध्ये माया सोनवणेची निवड

Women IPL टी-20 मध्ये माया सोनवणेची निवड

तळेगाव |वार्ताहर| Talegav

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुकन्या आणि गोलंदाजीने क्रिकेटचे मैदान गाजविणार्‍या क्रिकेटपटू कु. माया दत्तात्रय सोनवणे हिची महिला आयपीएल टी-20 चॅलेंज 2022 साठी निवड झाली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू माया हिच्या चिंचोली गुरव गावात जल्लोषाचे वातावरण आहे.

महिला आयपीएल टी-20 चॅलेंज 2022 सामने पुण्यातील क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर 23 ते 28 मे दरम्यान होतील. ती व्हेलॉसिटी टीमकडून खेळेल. यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

माया सोनवणे ही सामान्य कुटुंबातील असून सिन्नर येथील सुनील कानडी यांच्यामुळे क्रिकेटकडे वळली. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्व. अविनाश आघारकर यांचे मार्गदर्शन लाभले. वयाच्या केवळ 11 व्या वर्षीच मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती.

कु. माया सोनवणे ही संगमनेर येथील राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे यांची पुतणी आहे. या निवडीबद्दल तिचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, माजी सरपंच योगेश सोनवणे सहित मान्यवरांनी कौतुक करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com