तीन हजाराची लाच घेताना महिला लघुलेखक एसीबीच्या जाळ्यात

तीन हजाराची लाच घेताना महिला लघुलेखक एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाची कारवाई

अहमदनगर|Ahmedagar

चुकीचा फेरफार रद्द करणेबाबत सुरु असलेल्या दाव्यातील निकालपत्राचे आदेशाची प्रत देणे करिता तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच घेताना

श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील लघुलेखक श्रीमती शैला राजेंद्र झांबरे (रा. वसंत टेकडी, नगर, मुळ रा. तिसगाव ता. पाथर्डी) यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने गुरुवारी दुपारी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे ही कारवाई केली.

यातील तक्रारदार यांचे जमिनीचे संदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा- पारनेर यांचे समक्ष, "चुकीचा फेरफार रद्द करणेबाबत" सुरु असलेल्या दाव्यातील निकालपत्राचे आदेशाची प्रत देणे करिता लघुलेखक झांबरे यांनी तक्रारदार यांचे कडे दिनांक 16 डिसेंबर रोजी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याच वेळी झांबरे यांनी 4 हजार रुपये स्विकारुन उर्वरित रक्कम घेऊन आल्यावर आदेशाची प्रत देईल असे सांगितले.

तक्ररदार यांना लाच देण्याची इच्छा नसलेने त्यांनी ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये पंचासमक्ष 5 हजारची मागणी करुन तडजोड अंती 3 हजारांची मागणी केली. झांबरे यांनी सदरची रक्कम गुरुवारी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे, उप अधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com