माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह चार जणांवर गुन्हा

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह चार जणांवर गुन्हा

राहुरी |प्रतिनिधी| RAhuri

मुलगा होत नाही, तसेच घर खर्चासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणत नाही, म्हणून सौ. शीतल ढगे या विवाहित महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सन 2009 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान घडली. सौ.शीतल निलेश ढगे, वय 33 वर्षे रा. महात्मा नगर, नाशिक हल्ली रा. साईनगर राहुरी, या महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, 2009 साली मुलगी झाल्यानंतर 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान फिर्यादी सौ. शीतल ढगे यांना मुलगा होत नाही.

तसेच घर खर्चासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणत नाही. म्हणून या घटनेतील आरोपींनी फिर्यादी सौ. शीतल ढगे यांना वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन उपाशीपोटी ठेवले. या त्रासाला कंटाळून सौ. शीतल ढगे यांनी राहुरी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांसमक्ष सर्व हकिकत कथन केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती निलेश तान्हाजी ढगे, सासरा तान्हाजी बहिरू ढगे, सासू नलिनी तान्हाजी ढगे सर्व रा. प्लॉट नं. 141 महात्मा नगर, नाशिक तसेच नणंद सविता आडभाई रा. प्रोफेसर कॉलनी, ता. नगर. या चारजणांवर पैशासाठी छळ करून मारहाण केल्याचा तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com