महिलेला मारहाण करत मंगळसूत्र चोरले

महिलेला मारहाण करत मंगळसूत्र चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतामध्ये गवत घेण्यास विरोध केल्याच्या कारणातून दोघांनी एका महिलेला मारहाण (Women Beating) करत विनयभंग (molestation) केला. तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून (mangalsutra was stolen) नेले असल्याची घटना नगर तालुक्यातील खातगाव टाकळी (Khatgav Takali) शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police station) दोघांविरोधात जबरी चोरी, वियनभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला (Filed a crime) आहे.

प्रकाश सुभाष पवार, किसन राजाराम पवार (दोघे रा. खातगाव टाकळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. गुरूवारी सकाळी खातगाव टाकळी शिवारातील उसाच्या शेतामध्ये फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा काम करत होते. यावेळी किसन पवार यांची मुलगी निकीता पवार हिला शेतामध्ये गवत घेण्यास फिर्यादी महिला व त्यांच्या मुलाने विरोध केला.

याचा राग किसन पवार याला आल्याने त्याने त्याचा चुलतभाऊ प्रकाश पवार याला बोलावून घेतले व फिर्यादी महिलेसह त्यांच्या मुलाला मारहाण केली. फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत मंगळसूत्र चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com