कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिला शेतकर्‍यांना प्राधान्य - बोराळे

बाभळेश्वरला महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस
कृषी विभागाच्या योजनांमध्ये
महिला शेतकर्‍यांना प्राधान्य - बोराळे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. महाडिबीटी पोर्टलवरून कृषि विभागाकडील योजनांमध्ये महिला शेतकरी भगिनींसाठी 50 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला असल्याने प्राधान्याने लाभ महिला शेतकर्‍यांना मिळणार आहे, अशी माहिती संगमनेर विभागाचे उपविभागिय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.

कृषी संजीवनी सप्ताह मोहिमेअंतर्गत महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस निमित्त, बाभळेश्वर येथे राहाता तालुक्यातील महिला बचत गट याना कृषि विभागातील विविध योजना व झचऋचए योजनेविषयी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली. त्याप्रसंगी श्री. बोराळे बोलत होते.

याप्रसंगी पुणे येथील कृषी उपसंचालक पांडूरंग सिरोदार, तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती अडसुरे, आत्माचे किशोर कडू, विषय तज्ञ वांढेकर, कृषी सहाय्यक श्रीमती लाटे, श्रीमती महागडे, वाकचौरे, वांढेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

श्री. बोराळे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सुक्ष्मखाद्यान्न उन्नयन योजनेचा लाभ घेवून महिला वैयक्तिकरित्या अथवा गटांच्या माध्यमातून योजनेत सहभागी होवू शकतात. अन्नधान्य व फळे भाजीपाला प्रकिया उद्योग उभारणीसाठी आर्थिक स्वरूपात अनूदान याकरता कृषि विभागामार्फत दिले जाते.

याप्रसंगी कृषी उपसंचालक पांडूरंग सिरोदार यांनी महिलांना अन्न प्रक्रिया योजनेत असलेल्या संधी व महत्त्व व विक्री या बाबत मार्गदर्शन केले व कृषि विभागातील योजनांचा लाभ घेणेबाबत आवाहन केले,

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com