
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील शिंगवे येथे राहाता तालुका कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हरभरा पिकावर महिलांची शेतीशाळेचे आयोजन केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली.
या दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे शांताराम सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे व महत्व याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी रासायनिक खत व कीटकनाशक यांचा कमी वापर करावा व जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढाण्यासाठी उसामध्ये पाचट अच्छादन करावे, असे त्यांनी सांगितले. बापूसाहेब शिंदे यांनी आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त, तृण धान्याचे महत्व तसेच व महिला शेतकर्यांनी या अन्नसधान्याची लागवड करून आहारात समावेश करावा, असे त्यांनी सांगितले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत महिलांनी अन्न प्रक्रियाबबत उद्योग सुरू करावे व सदर योजनेतून 35 टक्के लाभार्थ्यांना अनुदान मिळेल, सदर योजने अंतर्गत किशोर माळी यांनी अर्ज प्रक्रियेबाबत माहिती दिली.
यावेळी सरपंच सौ. बाभुळके उपस्थित होत्या. कृषी सहाय्यक किरण शिंदे यांनी आभार मानले. कृषी पर्यवेक्षक बोंबे व महिला शेतकरी उपस्थित होत्या.