
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
महिलेला फोनवर व प्रत्यक्ष बदनामीची धमकी देवून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना नेवासा येथे घडली असून याबाबत मुलाच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
याबाबत सुमित एकनाथ धोत्रे धंदा-मजुरी याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्याची आई मयत रेखा एकनाथ धोत्रे हिच्या बरोबर त्याचे वडील एकनाथ, भाऊ अमित व तो एकत्र राहतात त्यांच्याच परिसरात राहणारा मुकिंदा भीमराज आळपे याने त्याचे मयत आईला वेळोवेळी फोन करून धमकी दिली व त्याचे म्हणण्यानुसार वागली नाही तर मुलाला जीवे ठार मारेल अशी धमकी तो देत असे या त्रासाला कंटाळून हे धोत्रे कुटुंब नाशिक येथे स्थलांतरित झाले होते परंतु आरोपी मुकिंदा हा तरीही फोनवरून धमक्या देत असे तसेच त्याची आई चांगुनाबाई ही देखील धोत्रे कुटुंबियांना शिव्या देत जीवे मारण्याची धमकी देत असे. रेखा हिला आरोपी आई व मुलाने शारीरिक मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या केली.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी 292/2023 भारतीय दंड विधान कलम 306, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहे. आरोपी चांगुणाबाई आळपे व मुकिंदा आळपे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.