
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
आपण मानवी हक्क आयोगाचा पदाधिकारी व पुरोगामी पत्रकार संघाचा पत्रकार आहोत माझ्याकडे तुमचे अश्लील फोटो आहेत असे सांगून एका जणाने महिलेकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी खंडणी मागणार्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील एकता नगर परिसरात राहणार्या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह. या फिर्यादीत तिने म्हटले आहे की, शहरातील शौकत पठाण याने आपण मानवी हक्क आयोगाचे पदाधिकारी व पुरोगामी संघाचा पत्रकार आहोत असे सांगून आपल्याकडे माझ्या विरोधात खुप लेखी तक्रारी आलेल्या आहेत.
तुम्ही लोकांना त्रास देतात, याबाबत पुरावा म्हणून माझेकडे व्हीडीओ शुटींग, रेकॉर्डींग व तुमचे अश्लील फोटो आहेत. तुम्ही मला सहा लाख रुपये रोख रक्कम द्या नाहीतर मी तुमचे विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देईल, असे सांगून पठाण याने माझ्याकडे सहा लाख रुपये रोख रक्कम खंडणी स्वरुपात मागीतली आहे, असे या महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शौकत पठाण याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 384 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल श्री. धादवड हे करत आहे.