महिलेच्या पर्समधील पाच तोळ्याचे गंठण चोरले

‘या’ मंदिरामध्ये घडली घटना
महिलेच्या पर्समधील पाच तोळ्याचे गंठण चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसीतील निंबळक रोडवरील रेणुकामाता मंदिरातून एका महिलेचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेले. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता हर्षल भोईटे (रा. बदलापुर ता. अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी श्वेता भोईटे शुक्रवारी दुपारी रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्याकडील पर्स मंदिरातील रूममध्ये ठेवली होती. या पर्समध्ये त्यांचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण होते. रूमचा दरवाजा उघडा होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने उघड्या रूममध्ये प्रवेश करून पर्समधील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरले.

गंठण चोरीला गेल्याचा प्रकार काही वेळाने श्वेता भोईटे यांच्या लक्ष्यात आला. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून याबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पालवे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com