महिला पोलीस अंमलदाराची आत्महत्या

महिला पोलीस अंमलदाराची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार अर्चना रोहिदास कासार (रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

महिला पोलीस अंमलदार अर्चना कासार या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. त्यांना शनिवारी रात्री ड्युटी होती. त्यांनी रात्रभर ड्युटी केली. त्या रविवारी सकाळी घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना त्यांचे नातेवाईक सागर शिवाजी सुद्रिक (रा. भुतकरवाडी, सावेडी) यांनी उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अर्चना कासार यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्चना यांचा मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह त्यांच्या मैत्रिणींनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com