महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तु मला खुप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून एकाने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश शर्मा (पूर्ण नाव माहित नाही, रा. सिध्दी कॉलनी, तारकपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2 फेबु्रवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता राजेश शर्मा हा फोनवर म्हणाला की, तु मला खुप आवडते. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तसेच 7 फेबु्रवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता त्याने डावा हात पकडून त्याच्याजवळ ओढून घेतले.

तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर 9 फेबु्रवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता पीडितेच्या राहत्या घरासमोर येऊन पीडीतेचा उजवा हात पकडून सोबत चल, असे म्हणून जवळ ओढले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com