हॉटेल व्यावसायिक महिलेवर कामगाराकडून अत्याचार

हॉटेल व्यावसायिक महिलेवर कामगाराकडून अत्याचार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणार्‍या कामगाराने हॉटेल व्यावसायिक असलेल्या मालकीणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.

तालुक्यातील एका गावात हॉटेल मध्ये सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. तालुक्यातील एका गावात सदर पीडीत महिला ही हॉटेल चालवत होती. आरोपी हा त्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला होता. गुरुवारी सकाळी त्याने मालकीणीवर धमकी देत अत्याचार केला. झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडित महिलेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हरिश्चंद्र कचरु शेवडे (रा. वाळुंज, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com