बस स्थानकावर महिलेचे दागिने चोरले

बस स्थानकावर महिलेचे दागिने चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील पुणे एसटी बस स्थानकावरून एका महिलेकडील 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता भाऊसाहेब गायकवाड (वय 45 रा. नम्रता हॉटेलसमोर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या रविवारी दुपारी एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी पुणे बस स्थानकावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडील 10 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com