महिलेचे दागिणे, रोकड चोरली

बस स्थानकावरील घटना
महिलेचे दागिणे, रोकड चोरली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माळीवाडा बस स्थानकावर अज्ञात चोरट्याने महिलेकडील एक तोळा सोन्याचे दागिणे व पाच हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती पुनम भगत (वय 35, मुळ रा. शिगडोह, ता. मानोरा, जि. वाशिम, हल्ली रा. वाळकी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. भारती भगत या मंगळवारी पहाटे साडेचार वाजता बाहेरगावी जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी भारती भगत यांच्याकडील आठ ग्रॅमचे सोन्याची मोहनमाळ, दोन ग्रॅम सोन्याचे कानातील व पाच हजार रूपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. त्यांनी पुढे प्रवास न करता कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन गाडगे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com