महिला शेतकर्‍याला 204 रुपये नुकसान भरपाई

महिला शेतकर्‍याला 204 रुपये नुकसान भरपाई

शेवगाव शहर |प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील खडके येथील महिला शेतकरी विजया चंद्रकांत पाखरे यांनी आपल्या 6 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीसाठी 1799 .49 रुपये भरून कापसाचा विमा 19 जुलै 22 ला उतरवला होता. तालुक्याच्या विविध भागात दहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या कपाशीचे शंभर टक्के नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर संबंधित विमा कंपनीकडे त्यांना पीक विमा नुकसानभरपाई म्हणून 11 ऑक्टोबर 22 ला केवळ 204 रुपये देऊन संबंधित महिला शेतकर्‍यांची क्रूर थट्टा केल्याची त्यांची तक्रार आहे.

आता याबाबत कोणाकडे दाद मागायची याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. विमा कंपनीकडून थातुर मातूर कारवाई करून मदत देण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांची बोळवण केली जाते. यासंदर्भात निसर्गांनी मारलं तर शासनाने तारायला हवं म्हणून, कृषी खाते महसूल खाते तथा लोकप्रतिनिधींनी अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना त्यांची नुकसान भरपाई सन्मानपूर्वक मिळवून द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com